Pahalgam Attack : पाकिस्तानचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा एकदा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना नेमकं काय केलं?

Pahalgam Attack : पाकिस्तानचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा एकदा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना नेमकं काय केलं?

| Updated on: Apr 30, 2025 | 3:54 PM

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचे ढग दाटून येत आहेत. अशातच जगाकडून मदत घेण्यासाठी पाकिस्तानने खोटे बोल काढल्याचे पाहायला मिळत आहे. जगाला घाबरवण्यासाठी पाकिस्तान खोटं बोलल्याचं समोर आलंय.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. पाकिस्तानला भीती आहे की भारत कधीही प्रत्युत्तर म्हणून हल्ला करू शकतो. यामुळे पाकिस्तानी लढाऊ विमाने नियंत्रण रेषेपासून आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत गस्त घालत आहेत. एवढेच नाही तर पाकिस्तानने चिनी हवाई संरक्षण प्रणाली HQ-9 देखील तैनात केली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानातील तणावर दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच भारतीय हवाई दलाच्या राफेल आणि सुखोई SU- 30 MKI विमानांना रोखण्यासाठी पाकिस्तानने चीनकडून खरेदी केलेली HQ-9 हवाई संरक्षण प्रणालीचा वापर केला जात असल्याची माहिती मिळतेय. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे पाकिस्तानची चांगलीच पोलखोल झाली असून अवघ्या जगासमोर पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडलं आहे. भारताच्या चार राफेलने पाकमध्ये घिरट्या घातल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा असल्याचे सांगितले जात आहे.

Published on: Apr 30, 2025 03:54 PM