video : जनतेच्या प्रश्नावर अधिवेशन व्हायला पाहिजे होतं- पंकजा मुंडे

| Updated on: Mar 28, 2022 | 2:43 PM

अर्थसंकल्पीय अधिवेशनातील कामकाजावर भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी नाराजी दर्शवली आहे. विरोधकांनी या अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik)  यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. तर सत्ताधाऱ्यांनी ही मागणी धुडकावून लावली होती. त्यावर पंकजा मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करतानाच भाजपलाही (bjp) घरचा आहेर दिला आहे. राजीनामा मागणारे विरोधक आणि राजीनामा देणारे सत्ताधारी अधिवेशनात हेचं […]

Follow us on

अर्थसंकल्पीय अधिवेशनातील कामकाजावर भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी नाराजी दर्शवली आहे. विरोधकांनी या अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik)  यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. तर सत्ताधाऱ्यांनी ही मागणी धुडकावून लावली होती. त्यावर पंकजा मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करतानाच भाजपलाही (bjp) घरचा आहेर दिला आहे. राजीनामा मागणारे विरोधक आणि राजीनामा देणारे सत्ताधारी अधिवेशनात हेचं दिसलं. जनतेच्या प्रश्नावर अधिवेशन व्हायला पाहिजे होतं, असा टोला पंकजा मुंडे यांनी भाजपलाही लगावला आहे. वरळीतील मार्स-1 या प्री-प्रायमरी शाळेचं उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी काश्मीर फाईल्स हा सिनेमा पाहिला नसल्याचंही स्पष्ट केलं.