मोठी घडामोड! सुप्रिया सुळे 8 खासदारांसह पंतप्रधान मोदींना भेटणार; आज दिल्लीच्या बैठकीत काय निर्णय होणार?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजपासून शेवटचा आठवडा सुरू होत असून, या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्षाकडून महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर संसदेत डिलिमिटेशन विधेयक पुन्हा सादर केले जाण्याची चर्चा असल्याने या अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, दिल्लीत सत्ताधारी खासदारांच्या भेटीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदारही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली ही भेट सोमवारी सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहिती आहे. सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत या भेटीची माहिती दिली आहे.
या भेटीमध्ये खासदारांच्या मतदारसंघातील रखडलेली विकासकामे, नागरिकांचे प्रश्न आणि विविध स्थानिक मागण्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, संसदेत डिलिमिटेशन विधेयक सादर होण्याची शक्यता असतानाच शरद पवार गटाचे खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याने या भेटीला राजकीयदृष्ट्याही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, रोहित पवार यांनीही या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार गटाचे खासदार डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मतदारसंघातील विकासकामे आणि जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या भेटीत सहभागी होणाऱ्या खासदारांमध्ये सुप्रिया सुळे (बारामती), डॉ. अमोल कोल्हे (शिरूर), अमर काळे (वर्धा), निलेश लंके (अहमदनगर), बाळ्यामामा म्हात्रे अर्थात सुरेश म्हात्रे (भिवंडी), धैर्यशील मोहिते पाटील (माढा), भास्कर भगरे (दिंडोरी) आणि बजरंग सोनवणे (बीड) यांचा समावेश असल्याची माहिती आहे.
एकीकडे डिलिमिटेशन विधेयकाची संभाव्य मांडणी, दुसरीकडे शरद पवार गटाच्या खासदारांची पंतप्रधान मोदींसोबतची भेट आणि लोकसभेत सादर होणारी महत्त्वाची विधेयके, यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा राजकीयदृष्ट्या चांगलाच महत्त्वाचा ठरणार आहे.