रवी राणा यांनी घेतला नवनीत राणा यांच्यासाठी खास उखाणा; म्हणाले, ‘तू हेमामालिनी मैं तेरा…’

रवी राणा यांनी घेतला नवनीत राणा यांच्यासाठी खास उखाणा; म्हणाले, ‘तू हेमामालिनी मैं तेरा…’

| Updated on: Jan 17, 2023 | 7:44 AM

अमरावतीतील पतंग महोत्सवादरम्यान नवनीत राणांनी उखाणा घेतला, त्यानंतर रवी राणांनी देखील घेतला खास उखाणा...

अमरावतीमध्ये रवी दाम्पत्याकडून मकरसंक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पतंग महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले होते. पतंग महोत्सवात रवी राणा आणि नवनीत राणा यांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतला. मकरसंक्रातीनिमित्त युवा स्वाभिमानी पक्षाकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार रवी राणांनी त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांच्यासाठी खास उखाणा घेतला आहे.

राणा दाम्पत्य नेहमीच चर्चेत असते. राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल करण्यापासून ते मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणण्याच्या प्रकरणावरून त्या चर्चेत आहेत. मात्र नवनीत राणा यांनी पतंग महोत्सवात रवी राणांसाठी एक उखाणा घेतला. दही, साखर, तूप रवी मला आवडतात खूप, असे नवनीत राणा म्हणाल्या. यानंतर रवी राणांनी देखील त्यांच्यासाठी खास उखाणा घेऊन उपस्थितांची मनं जिंकली.

Published on: Jan 17, 2023 07:44 AM