मोठी बातमी! 20 वर्षांनंतरचा निकाल! माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही; पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपी निर्दोष

मोठी बातमी! 20 वर्षांनंतरचा निकाल! माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही; पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपी निर्दोष

| Edited By: | Updated on: Jun 20, 2026 | 1:32 PM

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल 20 वर्षांनंतर या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल जाहीर झाला.

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल 20 वर्षांनंतर या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल जाहीर झाला.

न्यायालयाने निकाल वाचताना माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीबाबत गंभीर निरीक्षण नोंदवले. माफीचा साक्षीदार पूर्णपणे विश्वासार्ह नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्याच्या जबाबांमध्ये अनेक विसंगती आणि तफावत आढळल्यामुळे त्याच्या साक्षीवर पूर्णपणे अवलंबून राहता येत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

या प्रकरणात माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण नऊ आरोपींवर खटला चालवण्यात आला होता. मात्र, उपलब्ध पुरावे आणि साक्षींचा विचार केल्यानंतर आरोपींविरोधात आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसा ठोस पुरावा नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.

त्यामुळे पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. या निकालामुळे राज्यभरात मोठी चर्चा सुरू झाली असून, गेली दोन दशके चर्चेत असलेल्या या हायप्रोफाईल प्रकरणावर न्यायालयाने अखेर पडदा टाकला आहे.

दरम्यान, निकालानंतर संबंधित पक्षकार आणि कायदेविषयक तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून, या निर्णयाचे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jun 20, 2026 1:28 PM
Follow Us