PDCC Bank Chairman | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अजित पवार नेमकी कुणाला संधी देणार?
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची आज दुपारी 1 वाजता निवडणूक पार पडणार आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी जिल्ह्यातील 3 ते 4 नावं चर्चेत आहेत. यामध्ये आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार अशोक पवार , माजी आमदार रमेश थोरात हि नावं चर्चेत आहेत.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची आज दुपारी 1 वाजता निवडणूक पार पडणार आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी जिल्ह्यातील 3 ते 4 नावं चर्चेत आहेत. यामध्ये आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार अशोक पवार , माजी आमदार रमेश थोरात हि नावं चर्चेत आहेत. मात्र, अजित पवार सांगणार तेच नाव निश्चित होणार आहे. यासाठी आज सकाळी 10 वाजता अजित पवार सर्व निवडून आलेल्या संचालकांची बैठक घेणार आहेत, याच बैठकीत नाव निश्चित होणार आहे. जिल्हा बँकेवर 17 जागा जिंकत राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवलंय. आता अजित पवार नेमकी कुणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
पुणे जिल्हा बँकेवरील संख्याबळ
राष्ट्रवादी – 17
काँग्रेस – 02
भाजप – 02
