Petrol, diesel prices : आज पुन्हा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ

| Updated on: Mar 25, 2022 | 11:00 AM

आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलचे दर प्रति लिटर मागे 76 पैशांनी तर डिझेलचे दर प्रति लिटर 84 पैशांनी वाढवण्यात आले आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये इंधनाच्या किमतीमध्ये तीनवेळा वाढ झाली आहे

Follow us on

नवी दिल्ली : आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या  दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलचे दर प्रति लिटर मागे 76 पैशांनी तर डिझेलचे दर प्रति लिटर 84 पैशांनी वाढवण्यात आले आहेत. चालू आठवड्यात मंगळवारी प्रथमच इंधनाच्या (Fuel)किमतीमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रत्येकी 80 पैशांची वाढ करण्यात आली होती. तर गुरुवारी पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर होत्या. शुक्रवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 97.81 रुपये तर डिझेलचा दर 89.07 रुपये इतका आहे. मुंबईमध्ये पेट्रल 112.51 तर डिझेल 96.70 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे प्रति लिटर दर अनुक्रमे 103.67 आणि 93.71 रुपये लिटर आहेत. तर कोलकातामध्ये पेट्रोल 107.18 आणि डिझेल 92.22 रुपये प्रति लिटर आहे. चार नोव्हेंबर 2021 नंतर 22 मार्च 2022 ला प्रथमच पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या चार दिवसांमध्ये तीन वेळा दरवाढ झाली आहे.