हा विजयोत्सव सिंदूरची शपथ पूर्ण करण्याचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

हा विजयोत्सव सिंदूरची शपथ पूर्ण करण्याचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

| Updated on: Jul 29, 2025 | 6:50 PM

आज सलग दुसऱ्या दिवशी लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली. यावेळी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलंच शाब्दिक युद्ध बघायला मिळालं.

मी हे भारताच्या विजयोत्सावचं अधिवेशन असल्याचं म्हटलं आहे. जेव्हा विजयोत्सवाची गोष्ट सांगतो तेव्हा दहशतवाद्यांच्या हेडक्वॉर्टरला मातीत घालण्याचा आहे. हा विजयोत्सव सिंदूरची शपथ पूर्ण करण्याचा आहे. भारताच्या सैन्य आणि शौर्याच्या विजयाची गाथा आहे. १४० कोटी भारतीयांची एकता, इच्छाशक्ती, त्यांच्या अप्रतिम विजयाची गोष्ट मी सांगत असतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली. यावेळी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलंच शाब्दिक युद्ध बघायला मिळालं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहाला संबोधित करत ऑपरेशन सिंदूरवर भाष्य केलं.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, मी याच विजय भावाने या सभागृहात भारताची बाजू मांडण्यासाठी उभा आहे. ज्यांना भारताची बाजू दिसत नाही, त्यांना मी आरसा दाखवण्यासाठी उभा आहे. मी १४० देशवासियांच्या भावनेत आपला स्वर मिसळण्यासाठी मी उभा आहे. १४० कोटी भारतीयांची गुंज सभागृहात घुमत आहे. त्यात मी माझा स्वर मिसळत आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्या प्रकारे देशाच्या लोकांनी मला साथ दिली, मला आशीर्वाद दिले, देशाच्या जनतेचं माझ्यावर कर्ज आहे. मी देशवासियांचे आभार व्यक्त करत आहे. मी देशवासियांचं अभिनंदन करत आहे, असंही पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितलं.

Published on: Jul 29, 2025 06:50 PM