Modi Meets BJP MP : जनसंपर्क ठेवा… महाराष्ट्रातील भाजप खासदारांनी मोदींची घेतली भेट, पंतप्रधानांनी काय दिल्या सूचना?

Modi Meets BJP MP : जनसंपर्क ठेवा… महाराष्ट्रातील भाजप खासदारांनी मोदींची घेतली भेट, पंतप्रधानांनी काय दिल्या सूचना?

Updated on: Dec 04, 2025 | 2:56 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील भाजप खासदारांना जनसंपर्क वाढवण्यासोबतच सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत. लोकांच्या समस्या सोडवणे, सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर देणे आणि संसदेत पूर्णवेळ उपस्थित राहून कामकाजात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

महाराष्ट्रातील भाजप लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी मोदींनी त्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. सकाळी साडेदहा वाजता सुमारे 20 ते 25 मिनिटे चाललेल्या या संवादात, खासदारांनी जनतेशी कायम संपर्क ठेवावा, असे आवाहन करत मोदींनी सूचना केल्याचे समजतेय. केंद्र आणि राज्य सरकारमार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ सामान्यांपर्यंत कसा पोहोचेल, याकडे लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवावीत आणि त्यांच्या समस्या सोडवण्यावर भर द्यावा, असेही मोदींनी सांगितले. सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून लोकांशी संवाद साधण्याचा सल्लाही त्यांनी दिला. याव्यतिरिक्त, खासदारांनी लोकसभा आणि राज्यसभेत पूर्णवेळ उपस्थित राहावे आणि कामकाजात सक्रिय सहभाग घ्यावा, अशी अपेक्षाही मोदींनी व्यक्त केली.

Published on: Dec 04, 2025 02:54 PM