PM Modi : लोकशाहीला कोंडलं अन् संविधान चिरडलं…, आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण मोदींची पोस्ट व्हायरल
'द इमर्जन्सी डायरीज या माझ्या आणीबाणीच्या काळातल्या प्रवासाचा इतिहास सांगतो. त्या काळातील अनेक आठवणींना उजाळा देऊन गेला. आणीबाणीच्या काळातले त्या काळ्या दिवसाची आठवण असलेल्या किंवा त्या काळात ज्यांच्या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागला अशा सर्वांना मी त्यांचे अनुभव सोशल मीडियावर शेअर करण्याचं आवाहन करतो.'
आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मोदींनी पोस्ट लिहिलेली आहे. भारतातील लोक हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून ओळखतात, असं मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. ‘भारताच्या लोकशाही इतिहासतील सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक असलेल्या आणीबाणीला आज पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. भारतातील लोक हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून ओळखतात. या दिवशी भारतीय संविधानात समाविष्ट असलेली मूल्ये बाजूला ठेवण्यात आली, मूलभूत अधिकार निलंबित करण्यात आले, पत्रकारांचे स्वातंत्र्य संपुष्टात आणण्यात आलं आणि अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना तुरुंगात टाकण्यात आलं. त्यावेळी सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारने लोकशाहीला कोंडून ठेवलं होतं.’, असं मोदी म्हणाले.
तर आणीबाणीविरुद्धच्या लढाईत खंबीरपणे उभे राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही सलाम करतो. आमच्या संविधानातील तत्त्वांना बळकटी देण्यासाठी आणि विकसित भारताचं आमचं स्वप्न साकार करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करतो, असंही मोदी म्हणाले.
