पोलिसांकडून मनसे पदाधिकाऱ्यांना समज !

| Updated on: May 03, 2022 | 6:43 PM

सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 116, 117, 153 आणि सहकलम 135 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. इतकंच नाही तर राज्यभरातील 15 हजार मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली असल्याची माहिती दिलीय.

Follow us on

पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादेतील जाहीर सभेनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. आता औरंगाबादेतील (Aurangabad) सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 116, 117, 153 आणि सहकलम 135 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. इतकंच नाही तर राज्यभरातील 15 हजार मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली असल्याची माहिती दिलीय. या सगळ्या प्रकारानंतर खालकर चौकात मनसे पदाधिकारी एकत्र आल्याने पोलीसही चौकात दाखल झालेत. दरम्यान पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना समज दिलीये. पोलिसांनी मनसे सरचिटणीस अजय शिंदे आणि इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन केलंय.