Flood | कन्नड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, औरंगाबादला जाणारी वाहतूक वळवली

Flood | कन्नड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, औरंगाबादला जाणारी वाहतूक वळवली

| Edited By: | Updated on: Aug 31, 2021 | 4:50 PM

दरड कोसळल्याने चाळीसगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वर कन्नड घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे अनेक वाहने आणि प्रवासी अडकले आहेत. चाळीसगाव मार्गे औरंगाबाद जाण्यासाठी इतर मार्गाने प्रवास करावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार राज्यभरात पावसाने जोर धरला आहे. राज्याच्या बहुतेक भागात काल रात्रीपासून संततधार ते जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस बरसत आहे. तिकडे औरंगाबादेत पाझर तलाव फुटला आहे. तर जळगावातील चाळीसगावातही जोरदार पावसाने नद्यांना महापूर आला आहे. त्यामुळे अनेक घरं, दुकानं पाण्याखाली गेली आहेत. तर औरंगाबादेतही तुफान पावसाने नद्यांना पूर आला आहे.

औरंगाबाद धुळे रोडवर रात्री मुसळधार पावसामुळे कन्नड घाटात मोठी दरड कोसळली या दरडीखाली म्हशी घेऊन जाणारा ट्रकवर ही दरड कोसळली या घटनेत ट्रक ड्रायव्हर मृत्युमुखी पडला असून या घटनेत अनेक म्हशीना आपला जीव गमवावा लागला आहे. कन्नड ते चाळीसगाव रस्त्यावर आशा दरड कोसळल्याने रास्ता संपूर्णपणे बंद झालेला आहे. सध्या पाऊस थांबला असल्याने रास्ता कसा सुरू करता येईल असा प्रयत्न होत असला तरी पुन्हा पाऊस झाल्यास स्थिती बिकट होऊ शकते.

Published on: Aug 31, 2021 04:36 PM