Dadar : मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी मोठी माहिती समोर, जिथं स्मारक तिथं….

Dadar : मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी मोठी माहिती समोर, जिथं स्मारक तिथं….

| Updated on: Sep 17, 2025 | 4:37 PM

मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पोलिसांना तपासात अडचण येत आहे. पुतळ्याच्या आजूबाजूला एकही सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत पोलिसांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करण्याचे आवाहन केले आहे. गुन्हा दाखल झाला असला तरी सीसीटीव्ही फुटेजचा अभाव तपासाला अडथळा ठरत आहे.

दादरमधील छत्रपती शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तींनी रंगफेक केल्याची घटना घडली. यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्या पुतळा असलेल्या ठिकाणाला भेट दिली आणि २४ तासात कोणी रंग टाकला त्याला शोधून काढा, अशा सूचना पोलिसांना दिल्या. यानंतर एक मोठी माहिती समोर आली आहे.   मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची घटना समोर आली आहे. यामुळे पोलिसांना घटनेचा तपास करण्यात अडचणी येत आहेत.

पुतळ्याच्या परिसरात एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाही, यामुळे घटना घडवणाऱ्यांना ओळखणे कठीण झाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलिसांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करण्याची सूचना दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी, सीसीटीव्ही फुटेज नसल्याने तपासात अडचण निर्माण झाली आहे. घटनेच्या मागील कारणांचा शोध घेतला जात आहे.

Published on: Sep 17, 2025 04:36 PM