tv9 Marathi Special Report | बिहार भवन होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही; बिहारच्या मंत्र्याची चिथावणी

tv9 Marathi Special Report | बिहार भवन होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही; बिहारच्या मंत्र्याची चिथावणी

| Updated on: Jan 25, 2026 | 11:47 AM

महाराष्ट्रातल्या मुंबईत बिहार भवन बांधण्याची घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली, तेव्हापासूनच बिहार भवनावरून वाद पेटला आहे. मनसेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे हे बिहार भवन मुंबईत होऊ देणार नाही या भूमिकेवर ठाम आहेत. यावर नितीश कुमार यांच्या पार्टीतले मंत्री अशोक चौधरी यांनी चिथावणी देण्याचं काम केलं आहे.

महाराष्ट्रातल्या मुंबईत बिहार भवन बांधण्याची घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली, तेव्हापासूनच बिहार भवनावरून वाद पेटला आहे. मनसेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे हे बिहार भवन मुंबईत होऊ देणार नाही या भूमिकेवर ठाम आहेत. यावर नितीश कुमार यांच्या पार्टीतले मंत्री अशोक चौधरी यांनी चिथावणी देण्याचं काम केलं आहे. मुंबईमध्ये बिहार भवन होण्यापासून रोखण्याची कोणाचीच ताकद नाही राज ठाकरे काय महाराष्ट्राचे राजे आहेत का? असं वक्तव्य करून चौधरींनी मनसे आणि राज ठाकरे यांना देखील डिवचलं आहे. चौधरींच्या या भडकाऊ वक्तव्यावर मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही असं वक्तव्य करत, मनसे नेते आक्रमक झालेत. बिहारच्या या मुद्द्यावरून सुद्धा मनसेने कठोर भूमिका घेतली होती. बिहारमध्ये भाजप आणि नितीश कुमार यांच्या जेडी(यू) च सरकार आहे. आणि बिहार सरकारनेच मुंबईमध्ये बिहार भवन बांधण्याचा निर्णय घेतला ज्याचं समर्थन महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारनं केलं आहे. पण आता बिहारच्या मंत्र्यांनी बिहार भवन रोखण्याची कोणाची ताकद नाही अशी चिथावणी दिल्यामुळे बिहार भवनाची वीट रचण्याआधीच ठिणगी पडली आहे.

Published on: Jan 25, 2026 11:47 AM