Pooja Chavan Death Case | Audio Clip | सुसाईडआधी कार्यकर्त्याचा कथित मंत्र्यांना फोन, पहिली ऑडिओ क्लिप
Pooja Chavan first Audio Clip

Pooja Chavan Death Case | Audio Clip | सुसाईडआधी कार्यकर्त्याचा कथित मंत्र्यांना फोन, पहिली ऑडिओ क्लिप

| Updated on: Feb 12, 2021 | 4:54 PM

या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. (Pooja Chavan Death Case First Viral Audio Clip)

मुंबई : बीड येथील पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने या प्रकरणावरून विरोधकही आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. कथित मंत्री आणि त्याच्या कार्यकर्त्याच्या संभाषणाच्या या क्लिप्स आहेत. (Pooja Chavan Death Case First Viral Audio Clip)

अरूण राठोड असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. तसेच तो या मुलीचा चुलत भाऊ असल्याचंही त्या कार्यकर्त्याच्या बोलण्यातून स्पष्ट होतं. पूजाच्या आत्महत्येपूर्वीपासून ते आत्महत्येनंतरचं संभाषण या क्लिपमध्ये आहे. त्यातून पूजा कोणत्या मानसिकतेत होती आणि ती कसली तरी ट्रीटमेंट घेत असल्याचं स्पष्ट होत आहे.