Pune News : रुग्णालयाचा हलगर्जीपणा नडला; गर्भवती महिलेचा मृत्यू, प्रकृती चिंताजनक असतानाही अॅडमिट करण्यासाठी केली होती 10 लाखांची मागणी
MLA Amit Gorakhe : पुण्यात एका रुग्णालयाने गर्भवती महिलेची प्रकृती चिंताजनक असतानाही 10 लाखांची मागणी करत महिलेला रुग्णालयात वेळेत दाखल करून न घेतल्याने या महिलेचा मृत्यू झाला असल्याचा आरोप आमदार गोरखे यांनी केला आहे.
पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीमुळेच गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजप आमदार अमित गोरखे यांचा आरोप आहे. आमदार गोरखे यांचे पीएक सुशांत भिसे यांच्या पत्नीचा या प्रकरणात मृत्यू झाला आहे. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने या महिलेला अॅडमिट करून घेण्यासाठी 10 लाख रुपये भरण्याची मागणी केलेली होती. या महिलेची प्रकृती चिंताजनक असताना देखील तिला रुग्णालयाने अॅडमिट करून घेतलं नाही, असा आरोप आमदार गोरखे यांनी केला आहे. त्यामुळे 2 जुळ्या मुलींना जन्म देऊन या महिलेचा मृत्यू झाला आहे. तनिषा सुशांत भिसे असं या महिलेचं नाव आहे.
Published on: Apr 03, 2025 06:12 PM
