नौशेराच्या वाघांनी शत्रूला नेहमीच जशास तसे उत्तर दिले; पंतप्रधान मोदींची सीमेवर जवानांसोबत दिवाळी

नौशेराच्या वाघांनी शत्रूला नेहमीच जशास तसे उत्तर दिले; पंतप्रधान मोदींची सीमेवर जवानांसोबत दिवाळी

| Edited By: | Updated on: Nov 04, 2021 | 1:10 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील नौशेरात जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

श्रीनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील नौशेरात जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी जवानांची तोंडभरून स्तुती केली. नौशेराच्या वाघांनी शत्रूंना नेहमीच जशास तसं उत्तर दिलं आहे, अशा शब्दात नरेंद्र मोदींनी जवानांची स्तुती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळी साजरी करण्यासाठी आज जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरला पोहोचले. यावेळी त्यांनी जवानांशी हस्तांदोलन केलं. त्यांची विचारपूस केली. तसेच जवानांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. नौशेरा सेक्टरमध्ये त्यांनी शहिदांना श्रद्धांजलीही अर्पण केली. नौशेराचे जवान शूर आहेत. जेव्हा जेव्हा शत्रूने आपल्या भूमीवर पाऊल ठेवलं. तेव्हा तेव्हा त्यांना जवानांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं, असं मोदींनी सांगितलं.

Published on: Nov 04, 2021 01:10 PM