Special Report | पंतप्रधान नरेंद्र मोदींची जवानांसोबत दिवाळी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नौशेरा सेक्टरमध्ये जाऊन जवानांशी संवाद साधला. लष्करातील जवान म्हणजे माझं कुटुंब आहे. या कुटुंबासोबतच मी प्रत्येक दिवाळी साजरी केली आहे.
श्रीनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी प्रमाणे यंदाही जवानांसोबत दिवाळी साजरी केली. मोदींनी यंदा नौशेरा सेक्टरमध्ये जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली. जवांनाशी हस्तांदोलन करत त्यांच्याशी मोदींनी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्जिकल स्ट्राईकचाही उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नौशेरा सेक्टरमध्ये जाऊन जवानांशी संवाद साधला. लष्करातील जवान म्हणजे माझं कुटुंब आहे. या कुटुंबासोबतच मी प्रत्येक दिवाळी साजरी केली आहे. आधी गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून मी जवानांसोबत दिवाळी साजरी करायचो. आता देशाचा पंतप्रधान म्हणून दरवर्षी जवानांसोबत दिवाळी साजरी करतो, असं मोदींनी सांगितलं.
