Priya Fuke : फुकेंचा कौटुंबिक वाद ‘राज’आदेशाने सुटणार? प्रिया फुके राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर दाखल

Priya Fuke : फुकेंचा कौटुंबिक वाद ‘राज’आदेशाने सुटणार? प्रिया फुके राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर दाखल

| Updated on: Jul 09, 2025 | 1:37 PM

Priya Fuke News : कौटुंबिक वादातून प्रिया फुके यांनी न्याय मागण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या दादर येथील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट दिली.

भाजप आमदार परिणय फुके यांच्या कौटुंबिक वादातून त्यांच्या सून प्रिया फुके यांनी न्याय मागण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या दादर येथील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट दिली. काही दिवसांपूर्वी प्रिया फुके यांनी विधान भवनाबाहेर आपल्या दोन मुलांसह आंदोलन केले होते, तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. आज त्या आपल्या मुलासह राज ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवतीर्थवर पोहोचल्या.

प्रिया फुके यांनी आरोप केला की, परिणय फुके साम, दाम, दंड, भेद अशा सर्व मार्गांचा वापर करून त्यांना त्रास देत आहेत. त्या म्हणाल्या, लोकांनी मला सांगितले की, जर न्याय हवा असेल तर राज ठाकरे यांना भेटा, ते तुम्हाला नक्कीच न्याय मिळवून देतील. त्यामुळे मी आज मोठ्या आशेने येथे आले आहे. मी राजसाहेबांची वेळ न घेता थेट भेटायला आले.

प्रिया फुके यांनी पुढे सांगितले, परिणय फुके हे सतत हा विषय न्यायालयीन असल्याचे सांगतात. पण तुम्ही लोकनेते असूनही घरातील महिलेला न्याय देऊ शकत नाही? सहा महिन्यांत येणारा निकाल त्यांनी व्यवस्थापन करून दीड वर्षे लांबवला. जेव्हा निकाल आला, तेव्हा सर्व बँक खाती रिकामी झाली होती. जर हा सासू-सुनेचा वाद असता, तर तो घरातच मिटला असता. परंतु परिणय फुके आम्हाला त्रास देण्यासाठी सर्व प्रकारचे हथकंडे वापरत आहेत. आम्हाला फक्त आमचा हक्क मिळावा, हीच मागणी आहे.

Published on: Jul 09, 2025 01:37 PM