Pune Party : ऐसा माल चाहिये… खडसेंच्या जावयाचा मेसेज, खेवलकरांच्या फोनमध्ये तसले व्हिडीओ अन् चॅटिंग? पोलिसांची माहिती काय?

Pune Party : ऐसा माल चाहिये… खडसेंच्या जावयाचा मेसेज, खेवलकरांच्या फोनमध्ये तसले व्हिडीओ अन् चॅटिंग? पोलिसांची माहिती काय?

| Updated on: Aug 01, 2025 | 12:07 PM

पुणे न्यायालयाने खडसेंच्या जावई प्रांजल खेवळकर आणि तीन इतर आरोपींना कोठडी सुनावली आहे. उद्या त्यांचे वकील जामिनासाठी अर्ज करतील. कोर्टात पुणे पोलिसांच्या माहितीमुळे खळबळ उडाली आहे.

पुण्यातील पार्टी प्रकरणात खडसेंचे जावई प्रांजल खेवळकरांची पुणे कोर्टानं खेवळकरांसह चार आरोपींना १४ दिवसांची न्यायालयात कोठडी सुनावली. त्यामुळे खडसेंच्या जामिनाचा मार्ग मोकला झाला आहे. खेवलकर आणि इतर आरोपी यांची रवानगी पुण्यातील येरवडा जेलमध्ये करण्यात आली आहे. आता खेवलकरांचे वकील जामिनासाठी अर्ज करतील, दरम्यान कोर्टात पुणे पोलिसांच्या माहितीमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, पती खेवलकर यांच्यासाठी त्यांच्या पत्नी रोहिणी खडसे पुन्हा एकदा वकिली कोर्टात दिसल्या आणि त्यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे म्हटले. दरम्यान, पुणे पोलिसांकडून तपास अधिकारी विजय कुंभार यांनी कोर्टात माहिती देताना म्हटलं की, प्रांजल खेवलकर यांच्या फोनमध्ये मुलीचा व्हिडीओ आणि चॅटिंग आढळलंय. तर हे फोटो आणि चॅटींग त्यांनी दुसऱ्या आरोपीला पाठवले आणि ऐसा मेसेज चाहिये असा मेसेज केला. नेमकं प्रकरण काय?

Published on: Aug 01, 2025 12:01 PM