मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला… पुण्यात काय घडलं?

मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला… पुण्यात काय घडलं?

| Updated on: Aug 11, 2026 | 12:03 PM

पुण्यातील गणेश पेठ परिसरात वडापाव घेण्यासाठी गेलेल्या रवींद्र राजेंद्र परदेशी यांचा वादानंतर मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास डुल्या मारुती चौक परिसरात हा प्रकार घडला. पायाला धक्का लागल्याच्या कारणावरून दोन तरूणांमध्ये वाद झाला.

पुण्यातील गणेश पेठ परिसरात वडापाव घेण्यासाठी गेलेल्या रवींद्र राजेंद्र परदेशी यांचा वादानंतर मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास डुल्या मारुती चौक परिसरात हा प्रकार घडला. पायाला धक्का लागल्याच्या कारणावरून दोन तरूणांमध्ये वाद झाला. त्यानंतर झालेल्या मारहाणीत एका तरुणाच्या छातीवर जोरात बुक्का मारल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

या घटनेनंतर तरुण घरी गेला आणि झोपी गेला. मात्र, बराच वेळ होऊनही तो उठत नसल्याने कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

दोघेही तरुण गणेश पेठ परिसरात राहत होते. वैभव एका बिल्डरकडे अकाउंटंट म्हणून काम करतात. दोघांचेही वडील रिक्षाचालक आहेत. वडापावच्या गाडीवर पाय लागल्याने सुरू झालेला वाद पुढे मारहाणीपर्यंत पोहोचला. याप्रकरणी पोलिसांनी वैभव किशोर साळुंखे याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. घटनेमागील नेमकी परिस्थिती आणि वादाचे कारण याबाबत पोलिसांकडून अधिक माहिती घेतली जात आहे. परिसरात या घटनेची माहिती पसरल्यानंतर नागरिकांमध्येही चर्चेला उधाण आले. पोलिसांकडून घटनेतील सर्व बाबी तपासल्या जात असून पुढील कारवाई करण्यात येत आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस तपासाला वेग आला आहे.

Published on: Aug 11, 2026 11:49 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us