Pune Rain : धन्य भिजलं आता खायचं काय? आज्जीला अश्रु अनावर
Pune Rain News : पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. यात अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे.
पुणे शहरासह जिल्ह्यात काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. दौंड तालुक्यातील चिंचोली या गावात सर्वाधिक पाऊस पडला. अचानक आलेल्या या मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत. अनेकच्या घरात या पावसाचं पाणी शिरलं आहे. त्यामुळे संसारोपयोगी सगळ्या गोष्टी खराब झालेल्या आहेत.
यंदा राज्यात मान्सून वेळेच्या आधीच दाखल झालेला आहे आणि नुसता दाखलच झालेला नाही तर पहिल्याच पावसात राज्यातल्या नागरिकांचं मोठं नुकसान या पावसाने केलं आहे. पुण्यात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. अचानक आलेल्या या पावसाने पुरस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलेलं असून शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे. दौंडमधल्या चिंचोली गावात देखील मुसळधार पावसाचं पाणी शेतकऱ्यांच्या घरात घुसलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर पडण्याची वेळ आली आहे. घरात साठवून ठेवलेलं धान्य आणि इतर गोष्टी पूर्णपणे भिजलेल्या असल्याने पहिल्याच पावसाने नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणलेलं आहे. आता खायचं काय असा प्रश्न इथल्या नागरिकांसमोर उभा आहे.
