Parth Pawar Land Deal : पार्थ पवारांना क्लीनचीट कशी? ‘ही’ एकच गोष्ट ज्यामुळं दादांच्या मुलावर गुन्हा नाही!
पुण्यात 1800 कोटींच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी पार्थ पवारांच्या अमिडिया कंपनीतील इतरांवर गुन्हे दाखल झालेत, पण मुख्य संचालक असलेल्या पार्थ पवारांवर नाही. स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट आणि कागदपत्रांवरील नावाचा अभाव हे कारण दिले जात असले तरी, विरोधकांनी त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
पुण्यातील एका मोठ्या जमीन घोटाळा प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आरोपानुसार, 1800 कोटी रुपयांची जमीन अमिडिया कंपनीने केवळ 300 कोटी रुपयांना खरेदी केली, ज्यात स्टॅम्प ड्युटीचीही मोठी सवलत घेण्यात आली. या कंपनीचे मुख्य संचालक पार्थ पवार असूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यांच्या कंपनीचे दुसरे संचालक दिग्विजय पाटील, शितल तेजवानी आणि उपनिबंधक रवींद्र तारून यांच्यावर मात्र गुन्हे दाखल झाले आहेत.
मात्र या जमीन व्यवहारात पार्थ पवारांचे नाव खरेदी खतावर नसल्याने त्यांच्यावर कारवाई झाली नसल्याचे सहनोंदणी उपमहानिरीक्षकांचे म्हणणे आहे. मात्र, कंपनीत पार्थ पवारांचे 99% भाग भांडवल असूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्याने विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नेमण्यात आली असून, एक महिन्यात अहवाल अपेक्षित आहे.
