पुणे बलात्कार प्रकरणात गावकऱ्यांकडून मिळाली मोठी माहिती, ‘आरोपी गावात आला अन्..’
आरोपी काल रात्री पुण्यातील गुनाट गावात आल्याची माहिती समोर आली आहे. गुनाट गावातील घरात आरोपी दत्तात्रय गाडेने पाणी मागितलं, अशी माहिती पुण्यातील शिरूर येथील गुनाट गावातील गावकऱ्यांनी दिली आहे.
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली आहे. दत्तात्रय गाडे नराधमाचं नाव आहे. हा आरोपी पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा रहिवाशी असून पोलिसांना या आरोपीसंदर्भात मोठी माहिती हाती लागली आहे. आरोपी काल रात्री पुण्यातील गुनाट गावात आल्याची माहिती समोर आली आहे. गुनाट गावातील घरात आरोपी दत्तात्रय गाडेने पाणी मागितलं, अशी माहिती पुण्यातील शिरूर येथील गुनाट गावातील गावकऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, गुनाट गावातील गावकऱ्यांकडून मिळालेल्या या माहितीनंतर पोलिसांकडून गुनाट गावात आरोपीचा कसून शोध घेण्याची मोहीम सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा फौजफाटा गुनाट गावात दाखल झाला आहे. गावात असणाऱ्या ऊसाच्या शेतामध्ये ड्रोन आणि डॉग स्कॉडच्या मदतीनं या आरोपीचा शोध सुरू आहे. स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या घटनेनंतर वातावरण तापलं असून, पोलिसांकडून आरोपीचा सर्वत्र शोध सुरू आहे. आरोपी ज्या गावात राहातो त्या गावाला तर छावणीचं स्वरुप प्राप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.
