शीतल तेजवानीची चौकशी सुरू; २५७ कोटींच्या व्यवहारांवर पोलिसांकडून प्रश्नचिन्ह

शीतल तेजवानीची चौकशी सुरू; २५७ कोटींच्या व्यवहारांवर पोलिसांकडून प्रश्नचिन्ह

| Updated on: Nov 20, 2025 | 4:43 PM

पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शीतल तेजवानी यांच्या पॉवर ऑफ ॲटर्नी कागदपत्रांची चौकशी सुरू केली आहे. महसूल आणि वनविभागाकडूनही नोटीस बजावण्यात आली आहे. २५७ कोटी रुपयांच्या व्यवहारांमध्ये पैसे न भरता सेल डीड कसे झाले, यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. व्यवहारांची तपासणी पूर्ण होईपर्यंत चौकशी सुरूच राहणार आहे.

पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) शीतल तेजवानी यांच्यासंदर्भात चौकशी सुरू केली आहे. त्यांच्या जुन्या कार्यालयावर महसूल व वनविभाग तसेच आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी उपस्थित राहण्यासंबंधी नोटीस बजावली आहे. शीतल तेजवानी यांनी आपल्या पॉवर ऑफ ॲटर्नीमध्ये पिंपरी चिंचवडमधील एका सोसायटीचा पत्ता दिला होता, जिथे आता तीन नोटीस लावण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप त्यांनी चौकशीसाठी हजेरी लावली नसल्याचे समोर आले आहे.

या चौकशीदरम्यान, पॉवर ऑफ ॲटर्नीच्या कागदपत्रांची आणि संबंधित व्यवहारांची सखोल तपासणी केली जात आहे. विशेषतः, २५७ कोटी रुपयांच्या व्यवहारांमध्ये पैसे न भरता सेल डीड कसे झाले, याबाबत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. व्यवहारांची पूर्ण तपासणी होईपर्यंत ही चौकशी सुरूच राहील, अशी माहिती मिळत आहे. चौकशीनंतर आर्थिक गुन्हे शाखा गुन्हे दाखल करण्याच्या तयारीत आहे. सध्या पुणे पोलीस सर्व संबंधित कागदपत्रांची पडताळणी करत आहेत.

Published on: Nov 20, 2025 04:43 PM