VIDEO : Pune |परीक्षा परिषदेचा ढिसाळ कारभार उघड, टीईटी परीक्षेच्या उत्तरपत्रिका पत्र्याच्या गोडाऊनमध्ये पडून

| Updated on: Dec 22, 2021 | 1:59 PM

परीक्षा परिषदेने घेतलेल्या विविध परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची खोकी या पत्र्याच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आले आहेत. पावसात या उत्तरपत्रिका भिजल्या, या उत्तरपत्रिकांना वाळवी लागली. आग लागण्यासारख्या घटना घडलया तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Follow us on

शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळा उघड झाल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. परिषदेने टीईटी परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका व महत्त्वाची कागदपत्रे चक्क पत्र्याच्या गोडाऊनमध्ये ठेवल्याचे समोर आले आहे. परीक्षा परिषदेने घेतलेल्या विविध परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची खोकी या पत्र्याच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आले आहेत. पावसात या उत्तरपत्रिका भिजल्या, या उत्तरपत्रिकांना वाळवी लागली. आग लागण्यासारख्या घटना घडलया तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांचे होणार नुकसानाची जबाबदारी कोण घेणार. परिषेदेकडे पुरेशी जागा नाही हे कारण देत परीक्षा परिषदेच्या बाहेरील मोकळ्या जागेतही सीलबंद पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. यातील एखादी पेटी घाळ  झाली तर त्याला जबाबाद कोण ?