Vladimir Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत महत्त्वपूर्ण करारांवर दिला भर

Vladimir Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत महत्त्वपूर्ण करारांवर दिला भर

| Updated on: Dec 05, 2025 | 5:47 PM

व्लादिमीर पुतीन यांनी भारताला तेलसाठे निर्यात करत राहण्याची ग्वाही दिली. पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यात गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रासह अनेक महत्त्वाचे करार झाले. दोन्ही देशांमधील व्यापार दहा टक्क्यांनी वाढला असून, सांस्कृतिक संबंधांनाही विशेष महत्त्व देण्यात आले. दहशतवादविरोधासह जागतिक मुद्द्यांवरही चर्चा झाली.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताला तेलसाठे निर्यात करत राहणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्यात फोनवरून सतत संपर्क असतो, असे पुतीन यांनी नमूद केले. दोन्ही नेत्यांनी जागतिक आणि स्थानिक मुद्द्यांवर चर्चा केली, तसेच नव्या आव्हानांवरही विचारविनिमय केला. या भेटीदरम्यान, गुंतवणूक आणि तंत्रज्ञानासंदर्भात महत्त्वाचे करार झाले आहेत. विशेष म्हणजे, भारत आणि रशिया मिळून ब्रेन ट्यूमरवर औषध बनवणार आहेत. दोन्ही देशांतील व्यापारात दहा टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती पुतीन यांनी दिली. ऊर्जा प्रकल्पांबाबतही दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली.

पुतीन यांनी भारतीय चित्रपटांची प्रशंसा करत भारतीयांना रशियाबद्दल खूप माहिती असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशिया आणि भारत यांच्यातील महत्त्वपूर्ण करारांवर भर दिला. अडचणीच्या काळात दोन्ही देश एकत्र उभे राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. मोदींनी रशिया-भारताने आतंकवादाविरोधात एकत्र सामना केल्याचे अधोरेखित केले आणि रशिया-युक्रेन युद्धावेळी भारताच्या शांततेच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. रशियाच्या नागरिकांसाठी 30 दिवसांचा टुरिस्ट व्हिसा उपलब्ध होणार असून, दोन्ही देशांमधील सांस्कृतिक मुद्द्यांना विशेष महत्त्व आणि व्यापारी संबंधांना नवीन ताकद मिळणार असल्याचे मोदींनी सांगितले.

Published on: Dec 05, 2025 05:47 PM