Tv9 Podcast | D-Mart मध्ये स्वस्तात किराणा विकणारा श्रीमंत मालक, कोण आहेत राधाकृष्ण दमानी?

Tv9 Podcast | D-Mart मध्ये स्वस्तात किराणा विकणारा श्रीमंत मालक, कोण आहेत राधाकृष्ण दमानी?

| Edited By: | Updated on: Aug 11, 2021 | 2:29 PM

1954 मध्ये बिकानेर राजस्थान येथे जन्मलेले राधाकृष्ण दमानी डी-मार्टचे संस्थापक आहेत. बिझनेस लीडर आणि स्टॉक एक्सपर्ट म्हणून ओळखले जाणारे राधाकृष्ण दमानी यांनी प्रत्यक्षात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेले नाही. जर आपण गेल्या वर्षी जुलैबद्दल बोललो तर तेव्हा त्यांचे नेटवर्थ त्यावेळी 14 अब्ज डॉलर होते.

शेअर बाजारानं अनेकांना रातोरात श्रीमंत केलंय, तर काहींना रसातळालाही नेलंय. बरेच लोक शेअर बाजारातील तज्ज्ञ राकेश झुनझुनवाला यांना आपला आदर्श मानतात. तसेच अनेक जण राकेश झुझुनवालांकडून गुंतवणुकीच्या टिप्सही घेतात. पण राकेश झुनझुनवाला हे स्वतः राधाकृष्ण दमाणी यांच्याकडून गुंतवणुकीच्या टिप्स शिकलेत. डीमार्ट जवळपास सगळ्यांना माहीत असेल, त्याच डीमार्टचं साम्राज्य हे राधाकृष्ण दमाणींनी मोठ्या कष्टानं उभं केलंय.

राधाकृष्ण दमानी डी-मार्टचे संस्थापक

1954 मध्ये बिकानेर राजस्थान येथे जन्मलेले राधाकृष्ण दमानी डी-मार्टचे संस्थापक आहेत. बिझनेस लीडर आणि स्टॉक एक्सपर्ट म्हणून ओळखले जाणारे राधाकृष्ण दमानी यांनी प्रत्यक्षात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेले नाही. जर आपण गेल्या वर्षी जुलैबद्दल बोललो तर तेव्हा त्यांचे नेटवर्थ त्यावेळी 14 अब्ज डॉलर होते.

डी मार्टची केली स्थापना

राधाकृष्ण दमानी यांनी सुपरमार्केट रिटेल चेन डी-मार्टची सुरुवात केली. डी-मार्टचे पहिले स्टोअर 2002 मध्ये उघडण्यात आले. DMart चे लक्ष्य ग्राहकांना परवडणारे सामान पुरवणे आहे. गेल्या 15 वर्षात राधाकृष्ण दमानी यांनी सुपरमार्केट चेनला सर्वात फायदेशीर अन्न आणि किराणा किरकोळ विक्रेता बनवलेय. देशभरात त्यांची 200 हून अधिक दुकाने आहेत. वर्ष 2017 मध्ये डी-मार्ट शेअर बाजारात सूचीबद्ध केले गेलेय आणि ते 102%च्या प्रीमियमवर सूचीबद्ध झाले.