Sanjay Raut ED Inquiry : संजय राऊत यांनी मराठी माणसाशी बेईमानी केल्याचा राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप

| Updated on: Jul 31, 2022 | 11:33 PM

शेरो शायरीला आता पुष्कळ वेळ मिळेल त्याचाही आनंद जेलमध्ये घ्यावा. ईडीची कारवाई योग्य, मात्र त्यांनी स्वत:हून चौकशीला जायला पाहिजे होतं, अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला.

Follow us on

संजय राऊत यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने ताब्यात घेतलं आहे. या कारवाईवर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. विखे पाटील म्हणाले की, आता लोकांना दूध का दूध पाणी का पाणी बघायला मिळेल. मराठी माणसाला घर न देता तुम्ही मराठी माणसाला घर न देता तुम्ही मराठी माणसाच्या भावनेशी खेळला याचं प्रायश्चित संजय राऊत कुठे करणार? झुकेंगे नही ही भ्रामक क्लपना, संजय राऊत म्हणजे महाराष्ट्र नाही. भावनिक भाष्य करुन त्यांनी लोकांची दिशाभूल करु नये. विचारांशी प्रतारणा करुन शिवसेना कुणाच्या दावणीला बांधली हे महाराष्ट्रानं पाहिलं. या कारवाईनं शिवसैनिकांनी नि:श्वास सोडला. इमानदारीची मुक्ताफळे आता जेलमध्ये जाऊन उधळीत बसा. शेरो शायरीला आता पुष्कळ वेळ मिळेल त्याचाही आनंद जेलमध्ये घ्यावा. ईडीची कारवाई योग्य, मात्र त्यांनी स्वत:हून चौकशीला जायला पाहिजे होतं, अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला.