VIDEO : भोंग्याच्या सर्वपक्षीय बैठकीला Raj Thackeray, Devendra Fadnavis गैरहजर

VIDEO : भोंग्याच्या सर्वपक्षीय बैठकीला Raj Thackeray, Devendra Fadnavis गैरहजर

| Updated on: Apr 25, 2022 | 12:21 PM

महाराष्ट्रात भोंग्याचा वाद निकाली निघावा, त्यावर तोडगा काढला जावा, याउद्देशानं सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे यांच्यासह देवेंद्र फडणवीस गैरहजर राहिलेत. तर दुसरीकडे इम्तियाज जलील आणि प्रकाश आंबेडकरांनीही बैठकीला दांडी मारली आहे. भोंग्याच्या मुद्यावर सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली. भोंग्याच्या मुद्द्यावरुन सध्या राज्याचं राजकारण तापलंय.

महाराष्ट्रात भोंग्याचा वाद निकाली निघावा, त्यावर तोडगा काढला जावा, याउद्देशानं सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे यांच्यासह देवेंद्र फडणवीस गैरहजर राहिलेत. तर दुसरीकडे इम्तियाज जलील आणि प्रकाश आंबेडकरांनीही बैठकीला दांडी मारली आहे. भोंग्याच्या मुद्यावर सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली. भोंग्याच्या मुद्द्यावरुन सध्या राज्याचं राजकारण तापलंय. त्यामुळे चर्चेतून तोडगा काढण्यासाठी आणि त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी सरकारनं सर्वपक्षीय बैठक घेण्याचा निर्णय घेतला होता. या बैठकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसह जाणार नसल्याची माहिती समोर आली. भोंग्यांवरुन बिघडत चाललेल्या कायदा-सुव्यवस्थेवर या बैठकी चर्चा करण्यात येणार होती.