Special Report | राज ठाकरे यांचं जय श्री राम, मनसेला नवसंजीवनी मिळणार ?

Special Report | राज ठाकरे यांचं जय श्री राम, मनसेला नवसंजीवनी मिळणार ?

| Edited By: | Updated on: Dec 03, 2021 | 9:25 PM

नववर्षाच्या तोंडावर राज ठाकरे यांनी आयोद्याचा दौरा आयोजित केला आहे. हा हिंदुत्ववादाचा झेंडा मनसेला नवसंजवीन देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.   

मुंबई :  नववर्षाच्या तोंडावर राज ठाकरे यांनी आयोद्याचा दौरा आयोजित केला आहे. हा हिंदुत्ववादाचा झेंडा मनसेला नवसंजवीन देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.   राज्यात सध्या महापालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मनसेनेही महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज ठाकरेंनी दौऱ्यांचा सपाटा लावला आहे. येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही मनसे तितक्याच जोमाने उतरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे भाजपच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला होता. आगामी निवडणुकीत भाजप मनसे एकत्र लढणार असल्याचे संकेत अनेक राजकीय जाणकारांनी दिले आहेत.