Raj Thackrey : मराठी माणूस एकत्र येऊ नये यासाठी राजकारण सुरू – राज ठाकरे

Raj Thackrey : मराठी माणूस एकत्र येऊ नये यासाठी राजकारण सुरू – राज ठाकरे

| Updated on: Jan 08, 2026 | 9:32 AM

मराठी माणूस एकत्र येऊ नये यासाठी राजकारण सुरू असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. बाहेरील लोकसंख्या वाढवणे, राजकीय पक्षांत फूट पाडणे आणि जातींमध्ये भेद निर्माण करून मराठी अस्मिता कमकुवत केली जात आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचे प्रयत्न आजही सुरू असून, याविरोधात एकत्र येणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हाराष्ट्रामध्ये मराठी माणूस एकत्र येऊ नये यासाठी नियोजनबद्ध राजकारण सुरू आहे, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. मुंबई आणि ठाणे परिसरातील वाढती बाहेरील लोकसंख्या, तसेच मुंबईचा महापौर उत्तर भारतीय किंवा हिंदू करणार अशा प्रकारची विधाने ही याच मोठ्या राजकारणाचा भाग असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचे जुने स्वप्न आजही काही लोकांचे असून, ते पूर्ण करण्यासाठीच ही सगळी खटाटोप सुरू आहे, असे ठाकरे यांनी नमूद केले.

राज ठाकरे यांनी महानगरपालिकांमधील वाढत्या परप्रांतीय लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली. ठाणे जिल्ह्यात आठ-नऊ महानगरपालिका असणे आणि मुंबईमध्ये बाहेरील लोकसंख्या वाढणे, हे केवळ रोजीरोटीसाठी येत नाहीत तर ते आपापले मतदारसंघ बनवत आहेत, हे दर्शवते. सध्या केंद्रात आणि राज्यात असे लोक सत्तेवर आहेत ज्यांची इच्छा आहे की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी व्हावी. जर भविष्यात महानगरपालिकांमध्येही असेच लोक आले, तर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या परिस्थितीकडे हतबलतेने पाहणे मान्य नसल्यामुळे आपण एकत्र आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Published on: Jan 08, 2026 09:32 AM