अदानी, अंबानीला सगळं आंदण द्यायचं म्हणून…; राज ठाकरेंचा हल्लाबोल

अदानी, अंबानीला सगळं आंदण द्यायचं म्हणून…; राज ठाकरेंचा हल्लाबोल

| Updated on: Oct 19, 2025 | 1:51 PM

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील निवडणुका आणि सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. मतदारयाद्यांमध्ये बोगस मतदार असल्याचा दावा करत, राज्यावरील सत्ता केवळ अदानी-अंबानींना शहरं आंदण देण्यासाठी असल्याचं त्यांनी म्हटलं. मुंबईतील विमानतळ आणि वाढवण बंदरासारख्या प्रकल्पांवरून त्यांनी महाराष्ट्राच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील निवडणुका आणि राजकीय परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदारही मतदारयाद्यांमध्ये बोगस मतदार असल्याचं सांगत असताना, निवडणुकांचा अर्थ काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील शहरं अदानी आणि अंबानी या उद्योगांना आंदण म्हणून देण्यासाठीच हे सर्व सुरू असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामकाज अदानी समूहाकडे जात असून, टप्प्याटप्प्याने ते नवी मुंबईकडे नेले जाईल. तसेच, सांताक्रूझमधील जमिनीचा ताबा अदानींना मिळेल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. यासोबतच पालघरमधील वाढवण बंदर आणि तिथे येणारे विमानतळ हे गुजरातधार्जिण्या लोकांच्या सोयीसाठी असल्याचा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्राची ओळख आणि अस्तित्व मिटवण्याचा हा प्रयत्न असल्याचं राज ठाकरे यांनी नमूद केलं.

Published on: Oct 19, 2025 01:51 PM