Raj Thackeray : माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात मुख्यमंत्री अल्लाह हाफिज… राज ठाकरे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या अल्लाह हाफिज बोलतानाचा व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावा केला. मुंबईत मनसे आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा करताना, ही युती महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीतील फुटीबाबत आणि शरद पवारांशी चर्चेबाबतही त्यांनी भाष्य केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत मनसे आणि शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) युतीची घोषणा केली. ही युती महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी यावेळी एका मुख्यमंत्र्यांच्या अल्लाह हाफिज बोलतानाच्या कथित व्हिडिओचा उल्लेख करत टीका केली. राज ठाकरे यांनी त्यांच्याकडे असे अनेक व्हिडिओ असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केला.
यासोबतच राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील सद्यस्थितीवरही भाष्य केले. काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याने महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र आहे. राज ठाकरे यांनी मात्र भाजपला काय हवे, ते भाजपने पाहावे. आम्हाला मराठी माणसाला काय हवे ते आम्ही पाहतो आहोत असे स्पष्ट केले. त्यांच्या मते, महाराष्ट्र प्रेमी कोणताही पक्ष किंवा संघटनेचे लोक या युतीत सहभागी होऊ शकतात, ज्यात भाजपातील काही अस्सल मराठी लोकांचाही समावेश असू शकतो.