Raj Thackeray यांचे कार्यकर्त्यांना नेमके काय आदेश? -Tv
बॅनरवर राज ठाकरे यांच्या नावापुढे हिंदूहृदयसम्राट असं लिहिण्यात आलं होतं. त्यानंत आता राज ठाकरे यांना हिंदूहृदयसम्राट नाही तर मराठी हृदयसम्राट म्हणा, असे आदेश मनसैनिकांना देण्यात आले आहेत.
मुंबई : महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या राजकारणात आजपर्यंत शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना हिंदूहृदयसम्राट ही उपाधी दिली गेली. मात्र, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही हिंदूहृदयसम्राट असं संबोधण्यात येत आहे. राज ठाकरे यांच्या हस्ते काल घाटकोपरमधील मनसेच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी मनसेकडून मोठी बॅनरबाजी करण्यात आली होती. त्या बॅनरवर राज ठाकरे यांच्या नावापुढे हिंदूहृदयसम्राट असं लिहिण्यात आलं होतं. त्यानंत आता राज ठाकरे यांना हिंदूहृदयसम्राट नाही तर मराठी हृदयसम्राट म्हणा, असे आदेश मनसैनिकांना देण्यात आले आहेत. गेल्या अनेक दशकांपासून देशात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढेच हिंदूहृदयसम्राट अशी उपाधी लावली जात होती. भाजपच्याही कुठल्या नेत्याच्या नावापुढे आजवर हिंदूहृदयसम्राट लावण्यात आलं नाही. मात्र, मनसेनं हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्यानंतर आता त्यांच्या नावापुढे हिंदूहृदयसम्राट लावण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगतेय. महत्वाची बाब म्हणजे मागे एकदा अशाच प्रकारचे बॅनर मनसे कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले होते. त्यावेळी मला हिंदूहृदयसम्राट म्हणून नका असं राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं होतं. मात्र, यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी राज यांना केवळ बॅनरवरच हिंदूहृदयसम्राट असं संबोधलं नाही तर राज ठाकरे यांच्यासमोरच हिंदुहृदयसम्राट राजसाहेब ठाकरे… अशी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली होती.
