VIDEO : Rajesh Tope | आम्ही कोणाला वाईन प्या असे म्हणू शकत नाही, म्हणणारही नाही
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी कोरोना विषाणू संसर्ग, तिसरी लाट आणि वाईनच्या सुपर मार्केटमध्ये दिलेल्या परवानगीवरुन करण्यात आलेल्या टीकेवर भाष्य केलं आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार कोरोनाची लाट मार्च महिन्याच्या मध्यावधीपर्यंत संपुष्टात येऊ शकते, असं राजेश टोपे म्हणाले.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी कोरोना विषाणू संसर्ग, तिसरी लाट आणि वाईनच्या सुपर मार्केटमध्ये दिलेल्या परवानगीवरुन करण्यात आलेल्या टीकेवर भाष्य केलं आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार कोरोनाची लाट मार्च महिन्याच्या मध्यावधीपर्यंत संपुष्टात येऊ शकते, असं राजेश टोपे म्हणाले. तसेच टोपे म्हणाले की, आम्ही कोणाला वाईन प्या असे म्हणू शकत नाही, म्हणणारही नाही. कोरोनाचा न्यूकॉन हा नवा व्हेरीएंट पुढे येत आहे. याबाबतच्या प्राथमिक माहितीनुसार राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. पण, राज्यातील सद्य स्थितीआधारे तज्ञांच्या मतानुसार मार्चच्या मध्यावधीपर्यंत कोरोनाची लाट संपुष्टात येऊ शकते, अशी दिलासादायक माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पंढरपूर मध्ये दिली.
