Raj Thackeray : शिवतीर्थवर भावा-बहिणींच्या नात्याचा गोडवा, राज ठाकरेंना कोणी बांधली राखी?

Raj Thackeray : शिवतीर्थवर भावा-बहिणींच्या नात्याचा गोडवा, राज ठाकरेंना कोणी बांधली राखी?

| Updated on: Aug 09, 2025 | 2:19 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाने एकमेकांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या. बहिण-भावाच्या या प्रेमळ नात्याचा सण शिवतीर्थवर एकत्र साजरा करण्यात आल्याचे फोटो व्हिडीओ समोर येत आहे.

राज्यासह देशभरात भाऊ-बहिणींच्या नात्याचा उत्सव असलेला रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय. अशातच राजकीय वर्तुळातील नेत्यांचा रक्षाबंधन हा सण देखील चर्चेत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज ठाकरे यांना त्यांच्या बहीण जयवंती देशपांडे यांनी राखी बांधली. तसेच राज ठाकरे यांचे मित्र नयन शाह यांच्या पत्नी हेतल शाह यांनी देखील राज ठाकरे यांच्या हातावर राखी बांधली. दरवर्षीप्रमाणे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांच्या मोठ्या बहीण जयवंती देशपांडे रक्षाबंधन या सणानिमित्त आल्या आणि त्यांनी आपला रक्षाबंधन हा सण साजरा केला. यावेळी नयन शहा यांच्या पत्नी हेतल नयन शहा यांनीही औक्षण करून राज ठाकरेंना राखी बांधली. या कौटुंबिक सोहळ्याचे काही खास क्षण आणि व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत.

Published on: Aug 09, 2025 02:19 PM