Ramdas Athwale : तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
Ramdas Athwale Statement : ठाकरे बंधु आणि पवार काका पुतण्याच्या एकत्र येण्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असतील तर मला आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र यावं लागेल. तरी मला अस वाटतं की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार नाहीत, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हंटलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येतील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट देखील एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यावर आठवले यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
पुढे आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरी महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल आणि त्याचा आम्हाला फायदा होईल. दोघांना एकत्रित यायचं असेल तर त्यांनी यावं. पण, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फारसा बदल होणार नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
Published on: May 15, 2025 04:11 PM
