Ramdas Kadam : बाळासाहेबांच्या हातांच्या ठशांच्या वादानंतर आक्रमक कदमांचे ‘आस्ते कदम’, घेतला यु-टर्न अन् दिला शिवरायांचा दाखला
बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या हाताचे ठसे घेण्यावरून रामदास कदमांनी केलेल्या वादग्रस्त विधानांवरून आता त्यांनी माघार घेतली आहे. दशरा मेळाव्यात केलेल्या आरोपांवरून भूमिका बदलत, बाळासाहेबांचे ठसे आदर म्हणून घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावर अनिल परबांनी चौकशीचे आव्हान दिले आहे, तर कदमांनी कायदेशीर कारवाईचे प्रत्युत्तर दिले आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या हाताचे ठसे घेण्यावरून रामदास कदमांनी केलेल्या वादग्रस्त विधानांवरून आता त्यांनी माघार घेतली आहे. दसरा मेळाव्यात त्यांनी या संदर्भात गंभीर आरोप करत चौकशीची मागणी केली होती. मात्र, आता त्यांनी आपली भूमिका बदलत, बाळासाहेबांचे ठसे आदर म्हणून घेतले असतील तर त्यात गैर काय, असा प्रश्न स्वतःच उपस्थित केला आहे.
यापूर्वी कदमांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह का ठेवला होता आणि काय शिजत होते, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता मात्र, ते म्हणतात की, बाळासाहेब हे आमचे दैवत आहेत आणि त्यांच्याविषयी असे घाणेरडे विचार मनात येणार नाहीत. अनिल परबांनी कदमांना चौकशीचे आव्हान दिले असून, कदम यांनी परबांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी दर्शवली आहे. राज्यात सध्या रामदास कदमांच्या पक्षाचे सरकार असल्याने, या प्रकरणी चौकशी होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
