Vaibhav Khedekar : उधर के रहें नही, यहाँ के हुये नहीं! ना मनसेचे राहिले ना भाजपचेही झाले.. तीन प्रयत्न तरीही पक्षप्रवेश रखडला! वैभव खेडेकरांची राजकीय कोंडी
मनसेतून बाहेर पडलेले वैभव खेडेकर अद्याप भाजपमध्ये प्रवेश करू शकलेले नाहीत. त्यांचा भाजप प्रवेश तीन वेळा रखडला असून, आता चौथ्यांदा ते प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. समर्थकांमध्ये याला सन्मान नव्हे तर अपमान मानले जात आहे. खेडेकर सध्या ना घर का ना घाट का अशा राजकीय अवस्थेत आहेत.
रत्नागिरीच्या खेडचे माजी नगराध्यक्ष आणि मनसेचे माजी नेते वैभव खेडेकर सध्या राजकीय कोंडीत सापडले आहेत. मनसेतून निलंबन झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांचे तीन पक्षप्रवेश सोहळे विविध कारणांमुळे रद्द झाले. सध्या ते ना मनसेचे राहिले आहेत, ना भाजपचे झाले आहेत. भाजप प्रवेशाचे प्रयत्न अयशस्वी ठरले तरी खेडेकर चौथ्या प्रयत्नासाठी तयार असल्याचे बोलले जाते. त्यांनी यासाठी भाजप नेते प्रवीण दरेकर आणि रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्याची माहिती आहे. समर्थकांमध्ये हा पक्षप्रवेश रखडणे अपमानास्पद मानले जात आहे. यापूर्वी ४ सप्टेंबर आणि २३ सप्टेंबर रोजी त्यांचे पक्षप्रवेश निश्चित होऊनही ते पुढे ढकलण्यात आले होते. बघा स्पेशल रिपोर्ट…
Published on: Oct 09, 2025 10:59 AM
