Ratnagiri ST Strike | रत्नागिरीत 3 हजाराहून अधिक एसटी कर्मचारी अजूनही संपावर

Ratnagiri ST Strike | रत्नागिरीत 3 हजाराहून अधिक एसटी कर्मचारी अजूनही संपावर

| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 10:45 AM

रत्नागिरीमध्ये गेल्या दीड महिन्यांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. त्यांना वेतनवाढ देखील देण्यात आली आहे. मात्र ते विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत.

रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये गेल्या दीड महिन्यांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. त्यांना वेतनवाढ देखील देण्यात आली आहे. मात्र ते विलिनीकरणाच्या मुद्द्यावर अडून बसले आहेत. जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याची भूमीक कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. आंदोलन सुरूच असल्याने रत्नागिरी आगारात शुकशुकाट पहायला मिळत असून, बस अभावी प्रवाशांचे हाल होत आहेत.