Rekha Jare case | रेखा जरे हत्याकांडाला नवं वळण, प्रेम प्रकरणातून हत्या केल्याचं समोर

Rekha Jare case | रेखा जरे हत्याकांडाला नवं वळण, प्रेम प्रकरणातून हत्या केल्याचं समोर

| Edited By: | Updated on: Jun 09, 2021 | 1:23 PM

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड (Rekha Jare murder Case) प्रकरणातील मुख्य सूत्रधार बोठेविरोधात (Bal Bothe) दोषारोप पत्र दाखल झालं आहे. पारनेर न्यायालयात बाळ बोठेसह आणखी सात आरोपींविरोधात पुरवणी दोषारोप पत्र दाखल करण्यात आलंय.

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड (Rekha Jare murder Case) प्रकरणातील मुख्य सूत्रधार बोठेविरोधात (Bal Bothe) दोषारोप पत्र दाखल झालं आहे. पारनेर न्यायालयात बाळ बोठेसह आणखी सात आरोपींविरोधात पुरवणी दोषारोप पत्र दाखल करण्यात आलंय. साडे चारशे पानांचं हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय. या दोषारोप पत्रात एक मोठा खुलासा करण्यात आलाय. प्रेम प्रकरणातून रेखा जरे यांची बाळ बोठेने हत्या केल्याचं पोलिसांनी दोषारोप पत्रात नमूद केलंय.