Virar News : मी हिंदी आणि भोजपुरीच बोलणार..; विरारमध्ये रिक्षा चालकाची मुजोरी, व्हिडीओ व्हायरल
Virar Auto Driver Video : विरार रेल्वे स्थानकाबाहेर एका रिक्षा चालकाचा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आला आहे.
मराठी आणि हिंदी भाषेवरून सुरू असलेल्या वादादरम्यान विरार रेल्वे स्थानकाबाहेर एका रिक्षा चालकाचा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत रिक्षा चालक आक्रमकपणे म्हणत आहे की, तो केवळ हिंदी आणि भोजपुरीच बोलेल, मराठी बोलणार नाही. त्याचा हा मुजोरपणा कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे.
हा व्हिडीओ विरार रेल्वे स्थानकाबाहेरील आहे, जिथे एका रिक्षा चालक आणि दुचाकीस्वार यांच्यात मराठी भाषा बोलण्यावरून वाद झाला. वादादरम्यान रिक्षा चालक आक्रमकपणे म्हणाला, मी हिंदी आणि भोजपुरी बोलणार, मराठी बोलणार नाही. तुम्हाला जे करायचे ते करा. मी हिंदीतच बोलणार. मीडियाला बोलवा, मी मराठी बोलणार नाही, फक्त हिंदीत बोलेन. या रिक्षा चालकाने द्वेषपूर्ण भाषेत तरुणाला दमदाटी केल्याचेही व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
