Sanjay Raut | तो पूर्व विदर्भातील नेता कोण? कोणत्या पक्षाचा? नाव जाहीर करा… संजय राऊत यांचं आवाहन

Sanjay Raut | तो पूर्व विदर्भातील नेता कोण? कोणत्या पक्षाचा? नाव जाहीर करा… संजय राऊत यांचं आवाहन

| Updated on: Feb 11, 2026 | 1:46 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत गंभीर आणि खळबळजनक दावे केले आहेत. त्यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या अपघातामागे 100 टक्के घातपात झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. या दाव्यानंतर त्यांनी प्रकरणाची सखोल आणि स्वतंत्र चौकशी होण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत गंभीर आणि खळबळजनक दावे केले आहेत. त्यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या अपघातामागे 100 टक्के घातपात झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. या दाव्यानंतर त्यांनी प्रकरणाची सखोल आणि स्वतंत्र चौकशी होण्याची मागणी केली आहे. रोहित पवार यांनी आपल्या दाव्यांना समर्थन देण्यासाठी काही छायाचित्रेही पत्रकार परिषदेत सादर केली. याशिवाय, विमान उड्डाणाशी संबंधित काही तांत्रिक बाबींचाही त्यांनी उल्लेख केला. त्यांच्या मते, अपघातामागे काही गूढ कारणे असल्याची शक्यता असून, त्या कारणांचा शोध घेणे आवश्यक आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी पूर्व विदर्भातील एका नेत्याचा संदर्भ दिला, ज्यामुळे अपघाताच्या परिस्थितीत संशय निर्माण झाला. मात्र, त्या नेत्याचे नाव त्यांनी गुप्त ठेवले.

या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. “पूर्व विदर्भातील ते नेते नेमके कोणत्या पक्षाचे आहेत? ते भाजपचे आहेत की राष्ट्रवादीचे? त्यांचे नाव सांगण्यात काहीच हरकत नाही,” असे राऊत म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, “जर त्या नेत्याने अजित पवारांना मुद्दाम उशिरा भेट दिली असेल आणि कारने जाण्याचा प्लॅन रद्द करायला लावला असेल, तर त्या नेत्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.” संजय राऊत यांनी अजित पवारांच्या अपघात प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे देखील म्हटले.

Published on: Feb 11, 2026 01:46 PM