आतंकवादाला रंग नसतो, अती कडवा विचार…; रोहित पवारांची पोस्ट चर्चेत
मालेगाव बॉम्बब्लास्टच्या निकालानंतर आमदार रोहित पवार यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केली आहे.
आतंकवादाला रंग नसतो, अती कडवा विचार हाच आतंकवाद आहे, असं आमदार रोहित पवार यांनी म्हंटलं आहे. याबाबत आपल्या एक्स अकाऊंटवर त्यांनी पोस्ट केली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर ही प्रतिक्रिया दिली आहे. अती कडव्या विचारांचे कोणत्याही धर्माचे नेते आपल्या राजकीय पोळ्या शेकतात, असंही त्यांनी या पोस्ट मध्ये म्हंटलं आहे. मालेगाव बॉम्बब्लास्ट निकालानंतर विरोधकांकडून यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
नथुराम गोडसे असो वा पहलगाम हल्ल्यातले आतंकवादी हे सगळे आतंकवाद्यांचे मूळ अतिकडव्या विचारांत आहे. आतंकवादाला कोणताही रंग नसतो, तर अती कडवा विचार हाच आतंकवाद आहे. राजकीय नाटकी पेंटर्सनी ही लक्षात घ्यायला हवं की, आम्ही मनूस्मृती कालही जळलेली, आजही जाळतो आणि उद्याही जाळू. देशात शेतकरी अडचणीत आहे, महिला सुरक्षा, बेरोजगारीचे प्रश्न ज्वलंत आहेत. या सगळ्याचा सामना हिंदू करतोय ना? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
