Rohit Pawar : ऐसा कैसा चलेगा ज्ञानेशबाबू? रोहित पवारांचा निवडणूक आयोगाला सवाल, गोपनीयतेबाबत दुहेरी भूमिका का?

Rohit Pawar : ऐसा कैसा चलेगा ज्ञानेशबाबू? रोहित पवारांचा निवडणूक आयोगाला सवाल, गोपनीयतेबाबत दुहेरी भूमिका का?

| Updated on: Nov 13, 2025 | 11:09 PM

रोहित पवारांनी निवडणूक आयोगाला मतदारांच्या गोपनीयतेबाबत दुहेरी भूमिकेबद्दल प्रश्न विचारला आहे. महाराष्ट्रातील सीसीटीव्ही फुटेजमुळे गोपनीयतेचा भंग होतो म्हणणाऱ्या आयोगाने बिहारमधील महिला मतदारांचे फोटो कसे काय प्रकाशित केले, असा त्यांचा सवाल आहे. या विरोधाभासाने आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

निवडणूक आयोगाने मतदारांच्या गोपनीयतेबाबत घेतलेल्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीदरम्यान मतदारांचे सीसीटीव्ही फुटेज दिल्यास गोपनीयतेचा भंग होईल, असे आयोगाने म्हटले होते. मात्र, याच निवडणूक आयोगाने बिहारमधील महिला मतदारांचे फोटो “ये निशान नही मेरी शान है, लोकतंत्र में मेरा योगदान है, वोट करेगा बिहार” या शीर्षकाखाली ट्वीट केले आहेत.

यामुळे विरोधकांनी आयोगाला, बिहारमध्ये महिलांच्या गोपनीयतेचा भंग होत नाही का, असा सवाल विचारला आहे. तसेच, महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान वाढले असताना सायंकाळी मतदान केंद्रांवर गर्दी होती, तर त्याचे सीसीटीव्ही फुटेज का दिले जात नाही, अशी मागणीही केली आहे. मतदारांचे फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज गोपनीयतेचा भंग करतात हा आयोगाचा तर्क नेमका कोणत्या आधारावर आहे, यावर आता विरोधकांनी बोट ठेवले आहे.

Published on: Nov 13, 2025 11:09 PM