Mumbai ST Bank :  माझे सगळे कपडे फाडले, अश्लील हावभाव… संचालकांवर महिलेचे गंभीर आरोप, मुंबई एसटी बँकेच्या बैठकीत घडलं काय?

Mumbai ST Bank : माझे सगळे कपडे फाडले, अश्लील हावभाव… संचालकांवर महिलेचे गंभीर आरोप, मुंबई एसटी बँकेच्या बैठकीत घडलं काय?

| Updated on: Oct 15, 2025 | 5:27 PM

मुंबईतील एसटी बँकेत सदावर्ते आणि अडसूळ गटांमध्ये कर्मचाऱ्यांच्या बैठकीत तुफान राडा झाला. यामध्ये संचालकांनी एका महिलेला मारहाण, शिवीगाळ करत जातीवाचक बोलल्याचा गंभीर आरोप आहे. महिलेचे कपडे फाडून मंगळसूत्र तोडण्यात आल्याचेही म्हटले आहे. धीरज तिवारी, सुनील राठोड यांच्यासह चार संचालकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून हे प्रकरण आता पोलीस ठाण्यात पोहोचले आहे.

मुंबईतील एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेत सदावर्ते आणि शिंदेंच्या सेनेच्या अडसूळ गटाच्या संचालकांमध्ये कर्मचाऱ्यांच्या आयोजित बैठकीत तुफान हाणामारी झाली. या घटनेमध्ये संचालकांनी एका महिलेला मारहाण, शिवीगाळ आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप आहे.

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, तिच्यावर हल्ला करत कपडे फाडण्यात आले आणि मंगळसूत्र तोडण्यात आले. या प्रकरणी धीरज तिवारी, बणकर, सुनील राठोड आणि प्रवीण जाधव या चार संचालकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडित महिलेने आपल्याला मारहाण झाल्याचे आणि हाताला मार लागल्याचे म्हटले आहे. हा वाद वाढण्यामागे राजकीय लागेबांधे आणि काही संचालकांनी आमिषापोटी दुसऱ्या गटात प्रवेश केल्याचे कारण असल्याचेही बोलले जात आहे. हे प्रकरण आता पोलीस ठाण्यात पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.

Published on: Oct 15, 2025 05:27 PM