Russia Supports Modi : पाकिस्तानसोबतचा वाद अन् पुतीन यांचा थेट मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत नेमकं काय घडतंय?

Russia Supports Modi : पाकिस्तानसोबतचा वाद अन् पुतीन यांचा थेट मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत नेमकं काय घडतंय?

| Updated on: May 05, 2025 | 4:32 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती पुतीन यांना ८० व्या विजय दिवसाबद्दल शुभेच्छा दिल्यात. यावेळी पुतीन यांनी पहलगाम हल्ल्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी फोनवरून संवाद साधला आहे. यावेळी रशियाचा भारताला पाठिंबा असल्याचे पुतीन यांनी म्हटलंय.

दहशतवादाविरुद्धच्या लढाईत रशियाने आता भारताला पाठिंबा दिल्याची मोठी माहिती समोर येत आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत देशाला संपूर्ण पाठिंबा असल्याचे रशियाचे राष्ट्रध्यक्ष पुतीन यांनी स्पष्ट केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्यात फोनवरून यासंदर्भात संभाषण झाल्याची माहिती मिळत आहे. युद्धजन्य परिस्थितीत भारताचा जुना मित्र रशिया पुन्हा मदतीला आला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतातील तणाव शिगेला पोहोचल्यानंतर पुतीन यांनी मोदींना फोन केला आहे. भारताच्या अतिरेक्यांविरोधातील लढ्याला रशियाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे पुतीन यांनी म्हटलंय. पुतीन यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध व्यक्त करत पुतीन यांनी हल्ल्यात मृत पावलेल्यांच्या प्रती संवेदना देखील व्यक्त केली आहे. हल्ल्याच्या दोषींना आणि त्यांच्या समर्थकांना न्यायाच्या कक्षेत आणलं पाहिजे असं पुतीन यांनी म्हटलंय.

Published on: May 05, 2025 04:32 PM