रशिया युक्रेन विध्वंस सुरुच; राष्ट्राध्यक्षांवर विषप्रयोग?

| Updated on: Mar 21, 2022 | 11:59 PM

रशिया-युक्रेन ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांच्यावर विषप्रयोग होण्याची शक्यता असल्याने एक हजार कर्मचाऱ्यांना त्यांनी बडतर्फे केले आहे. तर दुसरीकडे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना मारण्याचा प्रयत्न रशियाचा सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

Follow us on

रशिया-युक्रेन युद्ध अजूनही धुमसतच आहे. रशियाकडून होत असलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील हजारो लोकांचा जीव गेला आहे, तर राजधानी कीवसह अनेक शहरातील इमारती उद्धवस्त झाल्या आहेत. रशियाकडून क्षेपणास्त्रांचा सतत मारा होत असल्यामुळे जर्मनमध्ये अनेक नागरिकांनी स्थलांतर केले आहे. त्यांनी ज्या ज्या शहरात स्थलांतर करत आहेत, त्या तिथेली महानगरपालिकेच्या व्यवस्थापनाकडून स्थलांतरित नागरिकांची राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. जर्मनमध्ये रोज दहा हजारपेक्षा अधिख नागरिक स्थलांतरित झाले असून त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. रशिया-युक्रेन ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांच्यावर विषप्रयोग होण्याची शक्यता असल्याने एक हजार कर्मचाऱ्यांना त्यांनी बडतर्फे केले आहे. तर दुसरीकडे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना मारण्याचा प्रयत्न रशियाचा सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.