Angara Russia Plane Crash: पुन्हा मोठी विमान दुर्घटना, रशियात 50 प्रवाशांचं प्लेन क्रॅश, ATC शी संपर्क तुटला अन्..
गुरुवारी (२४ जुलै) सुमारे ५० जणांना घेऊन जाणाऱ्या अंगारा एअरलाइन्सच्या प्रवासी विमानाचा रशियन सुदूर पूर्वेकडील हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी) शी संपर्क तुटला. हे विमान चीनच्या सीमेवरील अमूर प्रदेशातील टिंडा शहराकडे जात होते.
आतंरराष्ट्रीय घडामोड समोर येत आहे. रशियाच्या विमानासोबत ATC चा संपर्क तुटल्याची मोठी माहिती समोर येत आहे. जवळपास ५० विमान प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानासोबत ATC चा संपर्क तुटला आहे. टिंडोला जाणाऱ्या अंगारा एअरलाईन्सच्या विमानासोबत हा संपर्क तुटल्याचे समजतेय.
मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या सीमेजवळ ५० जणांना घेऊन जाणारे एक रशियन प्रवासी विमान अचानक बेपत्ता झाले आहे. गुरुवारी (२४ जुलै) रशियाच्या सुदूर पूर्वेकडील भागात सुमारे ५० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एएन-२४ प्रवासी विमानाशी रशियन एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) चा संपर्क तुटला. अंगारा एअरलाइन्सचे हे विमान चीनच्या सीमेवरील अमूर प्रदेशातील टिंडा शहराकडे जात होते. चीनच्या सीमेवरील अमूर प्रदेशातील टिंडा शहराजवळ येताना विमान एटीसी रडार स्क्रीनवरून गायब झाले. तर रशियाच्या अमूर भागात अंगारा एअरलाइन्सच विमान कोसळलं असून . रशियन सैन्याला त्याचे अवशेष सापडले आहे. या घटनेनंतर सर्वच प्रवाशी मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
